ओजस अधिया यांचा ‘तबला सिम्फनी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगीत क्षेत्रामध्ये अगदी लहान वयात गाजवलेल्या  अतुल्य कर्तृत्वामुळे प्रकाशझोतात आलेल्या ओजस अधिया यांचा ‘तबला सिम्फनी’ अल्बम प्रकाशित होत आहे. पारंपरिक तबलावादन आणि पाश्चिमात्य शास्त्राrय संगीत रचना यांचा अतुल्य असा मिलाफ असलेला तसेच अत्यंत सुंदररीत्या संगीतरचना असलेला हा अल्बम हिंदुस्थानी राग ‘मिश्र कीरवाई’मध्ये असून आलाप देसाई याचे संगीत त्याला आहे.

‘तबला सिम्फनी’मध्ये बास, सेलो, व्हिला आणि व्हायोलीन यांच्या सहाय्याने कर्णमधुर असे संगीत साध्य केले गेले आहे. त्यासाठी चेन्नई स्ट्रिंग्जस्ची निर्मिती त्याला लाभली आहे. वूडविंडस आणि व्हायोलीनचे एकलवादन यांनी त्यात बहार आणली असून ही वाद्ये आयडी राव व मानस कुमार यांनी वाजवली आहेत. सर्वच तंतुवाद्यांच्या केंद्रस्थानी तबला असल्याने ‘तबला सिम्फनी’मध्ये सिम्बल किंवा तीम्पणी यांचा वापर केलेला नाही. 1993 साली सर्वात कमी वयाचा तबलावादक म्हणून ओजस यांचे नाव लिम्का बुकात नोंदवले आहे.