
लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. तो पुरस्कार स्विकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा षडमुखानंद सभागृहात होत आहे. या सोहळ्याचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले आहे.
लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे हे प्रथम वर्ष आहे. देशाची सेवा करणाऱ्या आणि त्यासाठी अनमोल त्याग करणाऱ्या एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या नावाने देण्यात येणारा हा पहिलाच पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.


























































