केंद्राच्या कामगार धोरणाला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा विरोध, शिवसेनेच्या महासभेला उपस्थित राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्राच्या कामगार विरोधी धोरणांना कडाडून विरोध करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बिकेसीमध्ये शनिवार, 14 मे रोजी बोलावलेल्या महासभेला हजारो म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

केंद्रातील भाजप सरकारने वेगवेगळे 29 कामगार कायदे रद्द करू त्याऐवजी केवळ 4 कायदे बनवले आहेत. त्यामुळे नोकरीत असुरक्षितता, बोनस, हक्काच्या अनेक सवलतींपासून कर्मचारी, कामगारांना वंचित ठेवले आहे. खासगीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. त्यात केंद्र सरकारच्याया चुकीच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत आहे. त्यामुळे महागाई सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याचा निषेध करण्यासाठी आणि केंद्राला जाब विचारण्यासाठी महासभेत सामील व्हा, असे आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे केले आहे.

असंतोषाला वाट मोकळी करून द्या

केंद्रात सत्तेत येण्यासाठी भाजपने अनेक आश्वासने दिली. मात्र, ती पूर्ण केली नाहीत. त्यामुळे सामान्य, कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी आणि आपल्या हक्काचे सरकार निवडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीत शनिवार, 14 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता बोलावलेल्या महासभेला उपस्थित राहा, असे आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि सरचिटणीस सत्यवान जावकर यांनी संघटनेच्या सदस्यांना आणि महापालिका कर्मचाऱ्यांना केले आहे.