
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेलच, तसेच त्यानंतरही हेच सरकार येऊल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आपण राज्य सरकारच्या कामावर समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अनेक मुद्द्यावर त्यांनी मते व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नांदेडमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
- राज्यसभेच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्यास काहीही अडचण नाही.
- त्यामुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येणार नाहीत.
- राज्य सहकारी बँकाबाबत केंद्र सरकार आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांनी दखल घ्यावी
- उसाचे गाळप पूर्ण होण्याबाबत सरकारने सूचना दिल्या आहेत.
- ऊस गाळपाबाबत सरकारची सकारात्मक भूमिका आहे
- ती व्यक्ती काय बोलली हे माहिती नसताना प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
- आपल्यावर कोणतरी टीका केली आहे, ती व्यक्ती काय बोलली ते माहिती नाही
- आम्ही ते वाचतो, एन्जॉय करतो आणि सोडून देतो.
- भाजपमधील काही नेते राज्य सरकारच्या शेवटच्या तारखा देत असतात.
- हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेलच, पण त्यानंतरही हेच सरकार येईल.
- सरकरमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. काहीजण विनाकारण संभ्रम निर्माण करत आहेत.
- तीन पक्ष एकत्र येत समन्वयाने चांगले काम करत आहेत.
- राज्य सरकारच्या कामावर आपण समाधानी आहोत.
































































