
निरोगी शरीरासाठी सुकामेव्यातील अक्रोड खाणे फायदेशीर आहे. अनेक पोषक तत्त्वांचा समावेश असलेल्या अक्रोडमध्ये जीवनसत्त्वे, मिनरल्स यांसह फॅट आणि अँण्टीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते. अक्रोड खाल्ल्यानंतर त्याच्यावरील जाड कवच आपण कचऱ्यात फेकून देतो, मात्र ज्याप्रमाणे अक्रोश आरोग्यासाठी गुणकारी आहे, त्याप्रमाणेच त्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया अक्रोडावरील कवचाचे अनेक फायदे आहेत.
– अक्रोडवरील कवच झाडांकरिता उत्तम ऑरगॅनिक खत म्हणून वापरता येऊ शकते. अक्रोडच्या कवचांवर एक चमचा अल्कोहोल टाका. आता हे कवच जाळून त्याची राख बनवा. ही राख थंड झाल्यानंतर झाडांकरिता वापरा. यामुळे झाडांचे आरोग्य सुधारेल.
– उन्हाळ्याच्या दिवसांत घरात उत्साही वातावरण राहण्याकरिता रूम फ्रेशनरचा वापर केला जातो. अक्रोडच्या कवचापासून ऑरगॅनिक अॅरोमा डिफ्युजरचा वापर करू शकता. याकरिता एका कांचेच्या भांड्यात अक्रोडचे कवच गोळा करून ठेवा. आता त्यावर काही सुकलेली फुले ठेवा. त्यानंतर तुमच्या आवडीचे सुगंधी इसेंन्शियल ऑईलचे 10 थेंब त्यामध्ये घाला. यामुळे तुमच्या घरात सुगंध पसरेल. एका काचेच्या जगात हे सर्व साहित्य घालून जगाला पेंट केले आणि रिबन बांधून सजावट करून ठेवू शकता.
– अक्रोडचे कवच घराची साफसफाई करण्यासाठीही वापरू शकता. प्लास्टिक, पितळी आणि रबरी वस्तूंवर डाग लागल्यास ते दूर करण्यासाठी अक्रोडचे कवच या वस्तूंवर घासा. यामुळे डाग निघून जाण्यास मदत होईल.
– अक्रोडच्या कवचापासून वॉल आर्ट तयार करून घर सुशोभित करण्याकरिता वापर करता येईल. याकरिता एक कार्डबोर्ड पेपर घेऊन तो रंगवा. आता फेविकॉलच्या मदतीने अक्रोडचे कवच तु्म्हाला हव्या त्या आकारानुसार या पेपरवर चिकटवा. वेगवेगळ्या रंगांनी ते कवचाचे तुकडे रंगवा. सुकल्यानंतर भिंतीवर लावा.
– अक्रोडच्या कवचापासून माउथवॉश तयार करू शकता. यामुळे तोंडाची दुर्गंधी जाईलच शिवाय तोंडाचे आरोग्यही सुधारायला मदत होईल. याकरिता अक्रोडचे कवच पाण्यात टाकून 30 मिनिटे उकळवा. आता हे पाणी थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर गाळून घ्या. एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवा. दररोज ब्रश केल्यानंतर 10-15 सेकंद या पाण्याने गुळण्या करा.



























































