
पुणे शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्याला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चंदननगर, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. गौरव बाळासाहेब थोरात (वय 23, रा. पठारे वस्ती, चंदननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दुचाकीचोर नरपतगिरी चौकात थांबल्याची माहिती पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे आणि नीलेश शिवतरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गौरव थोरातला अटक केली. चौकशीत त्याने चंदननगर आणि खडक हद्दीतून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, उपनिरीक्षक शुभांगी नरके, शाहिद शेख, नीलेश शिवतरे, सुमीत ताकपेरे, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश पाटोळे, गणेश ढगे, श्रीकांत दगडे, नारायण बनकर यांनी केली.























































