
इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकेडमी अर्थात आयफा सोहळा अबुधाबी येथे पार पडला. सोहळ्यामध्ये विकी काwशल, क्रिती सेनॉन, सई ताम्हणकर अशा अनेकांनी पुरस्कारावर आपले नाव कोरले. पॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.
आयफा सोहळा गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित करण्यात येतो. यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा अबुधाबी येथे 2 ते 4 जूनदरम्यान दिमाखात पार पडला. यंदा या सोहळ्याचं 22 वे वर्ष होते. ‘सरदार उधम’ या चित्रपटासाठी विकी काwशलने सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी’ या चित्रपटासाठी क्रिती सेनॉनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. ‘मिमी’ या चित्रपटासाठी मराठमेळी अभिनेत्री सई ताम्हणकरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. ‘शेरशाह’चे दिग्दर्शक विष्णू वर्धन यांचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरव करण्यात आला. सलमान खान, शाहीद कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, साराअली खान, अनन्या पांडे यांसारख्या अनेक बॉलीवूड कलाकारांनी आयफामध्ये हजेरी लावली होती.
सर्वोत्कृष्ट चित्रपट: शेरशाह
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: विष्णू वर्धन (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट अभिनेता: विकी कौशल (सरदार उधम)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: क्रिती सेनॉन (मिमी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: पंकज त्रिपाठी (ल्युडो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: सई ताम्हणकर (मिमी)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता: अहान शेट्टी
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: जुबिन नौटियाल रतन लंबियां (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: असीस कौर, रतन लंबियां (शेरशाह)
सर्वोत्कृष्ट संगीत: ए. आर. रहमान (अतरंगी रे), तनिष्क बागची, जसलिन रॉयल, जावेद-मोहसीन, विक्रम मॉन्ट्रोसे, बी. प्राक, जानी (शेरशाह)
विकीने इरफानला पुरस्कार केला अर्पण
अभिनेता विकी काैशलचा हा पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार आहे. विकीने हा पुरस्कार दिवंगत अभिनेता इरफान खानला समर्पित केला. इरफान खान यांचा मी खूप मोठा चाहता आहे. सरदार उधमची भूमिका मुळात त्यांचीच होती, असे विकी म्हणाला. विकीने पत्नी कतरिना पैफ आणि कुटुंबीय, दिग्दर्शक- निर्मात्यांचे आभार मानले. देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱया प्रत्येक शूरवीराचा हा पुरस्कार असल्याचेही विकी म्हणाला.

























































