
कर्नाटकमधील उप्पीनगडी सरकारी महाविद्यालयाने हिजाबसाठी आंदोलन करणाऱ्या 23 विद्यार्थिनींना निलंबित केले आहे. गेल्या आठवडयात या विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात बसण्यासाठी आंदोलन केले होते. याची गंभीर दखल घेत महाविद्यालय विकास समितीने घेतलेल्या बैठकीत या विद्यार्थिनींना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे भाजपचे पुत्तूरचे आमदार आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संजीव मातांदूर यांनी सांगितले. कर्नाटक सरकारने हिजाब घालून सरकारी महाविद्यालयात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे.



























































