‘अग्निपथ’साठी अर्ज करणाऱ्यांवर खाप पंचायतींचा बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अग्निपथ’ योजनेला देशभरातून विरोध वाढला आहे. या योजनेच्या माध्यमातून लष्करात भरती होण्यासाठी अर्ज करणाऱया तरुणांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन खाप पंचायतींच्या नेत्यांनी केले आहे. तसेच भाजपबरोबर या योजनेचे समर्थन करणाऱया उद्योजकांविरोधात भूमिका घेतली आहे. बुधवारी हरयाणाच्या रोहतक जिह्यात खाप पंचायती व इतर काही संघटनांची बैठक झाली. या बैठकीत हरयाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश आदी राज्यांतील नेते सहभागी झाले होते.