भाज्यांना महागाईची फोडणी पावसामुळे चांगल्या भाज्यांची आवक घटली, 30 ते 40 टक्के दर वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. नेहमीपेक्षा कमी प्रमाणात भाज्या बाजारात येऊ लागल्याने त्यांचे दरही 30 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत. मुंबई, नवी मुंबई, कल्याण येथील घाऊक बाजारांमध्ये पुणे, नाशिक, गुजरात येथून भाजीपाला येतो. परंतु त्या भागांमध्ये पावसाचा जोर असल्याने भाजीपाल्याच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. मुसळधार पावसामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या शेतीचेही नुकसान झाले आहे.

भाज्यांचे दर किलोमागे
वाटाणा – 100 रुपये
दोडका – 60 रुपये
सिमला मिरची – 70 रुपये
गवार – 70 रुपये
मेथी, लाल माठ जुडी – 40 रुपये