
NASA चे अंतराळ संशोधक जोनाथन मॅक्डॉवेल यांनी शास्त्रीय गणित मांडून चीनचे अनियंत्रित झालेले रॉकेट या आठवड्यात पृथ्वीर धडकण्याची भीती व्यक्त केली आहे. अनियंत्रित झालेले हे रॉकेट झपाट्याने पृथ्वीच्या दिशेने येत असून पृथ्वीवर कोणत्याही भागात ते धडकण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या भागात ते धडकणार, याबाबत निश्चित सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
24 जुलै 2022 रोजी चीनने एक लाँग मार्च रॉकेट अंतराळात सोडले होते. या रॉकेटने चीनच्या स्पेस स्टेनचा काही भाग अंतराळात पोहचवला होता. मात्र, त्यानंतर हे रॉकेट चीनच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे. दरवेळी चीनचे रॉकेट नियंत्रणाबाहेर जाण्याच्या घटना घडत आहेत. हे अनियंत्रित झालेले रॉकेट या आठवड्यात पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे. तीन वर्षातील ही तिसरी घटना आहे.
अनियंत्रित झालेले रॉकेट नियंत्रणात आणून ते समुद्रात पाडण्यात येईल, असे चीनकडून सांगण्यात येते. मात्र चीनला त्यावर नियंत्रण मिळवता येत नसल्याचे दिसून आले आहे. याआधी गेल्या वर्षी मे महिन्यात चीनचे रॉकेट पृथ्वीवर पडले होते. त्याआधी 2020 मध्ये चीनच्या रॉकेटचा एक भाग पश्चिम आफ्रिका आणि अटलांटिक महासागरात कोसळला होता.
चीनसारख्या देशाचे रॉकेट पृथ्वीवरील सर्व देशांसाठी धोका ठरत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कोसळलेले रॉकेट प-थ्वीर 170 किलोमीटर ते 372 किलोमीटरच्या क्षेत्रआत परिभ्रमण करत होते. आताही अनियंत्रित झालेले रॉकेट गेल्या वर्षीच्या रॉकेट प्रमाणेच पृथ्वीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही वर्षापासून स्पेस स्टेशनसाठी चीनकडून रॉकेट सोडण्यात येत आहेत. मात्र, ते काम झाल्यावर रॉकेट नियंत्रित पद्धतीने पृथ्वीवर परतले पाहिजे. मात्र, तसे होत नाही. रॉकेटचे काम झाल्यावर ते चीनच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे पृथ्वीला धोका निर्माण होत आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावर चीनच्या या घटनेचा निषेध होत आहे. आता जगभरातील सर्व रडार या अनियंत्रित झालेल्या रॉकेटवर नजर ठेवत आहेत. आता या आठवड्यात हे रॉकेट पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्या ठिकाणी ते कोसळणार याबाबतचे कयास बांधण्यात येत आहेत.
पृथ्वीवर कोसळताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यावर रॉकेटचा बराचसा भाग जळून खाक होण्याची शक्यता आहे. मात्र, काही भआग निवास भागात कोसळल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. हे रॉकेट रात्रीच्या वेळी पृथ्वीर कोसळल्यास आतषबाजी दिसण्याची शक्यता आहे.

























































