बीएसएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू–कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सीमा सुरक्षा बलातील (बीएसएफ) एन. हजारिका नावाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास ही घटना घडली. हजारिका हा 108व्या बटालियनच्या एफ तुकडीत तैनात होता. तो मूळचा आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील रहिवासी होता, तर 2004 साली बीएसएफमध्ये रुजू झाला होता.