
मुंबईतील रस्त्यांचे येत्या वर्षभरात 100 टक्के क्राँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. पश्चिम उपनगरातील मागाठाणे ते गोरेगाव पूर्व येथील साईबाबा कॉम्प्लेक्सपर्यंतचा 120 फुटी रस्त्यासंदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी मांडली होती.
यावरील चर्चेत आमदार सुनील प्रभू, योगेश सागर, पराग अळवणी आणि अजित पवार यांनी भाग घेतला. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असून त्यांनी या रस्त्यांच्या क्राँक्रीटीकरणासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.




























































