
मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 679 रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला. 614 रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती तर 65 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 18 जण ऑक्सिजन बेड देण्यात आले आहेत.
दिवसभरात 1 हजार 99 जण कोरोनामुक्त झाले तर 5 हजार 392 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात आज 1 हजार 846 कोरोनारुग्ण सापडले तर 4 जणांचा मृ्त्यू झाला. 2 हजार 240 जण कोरोनामुक्त झाले तर राज्यात 11 हजार 871 सक्रिय रुग्ण आहेत.


























































