
अॅपलच्या 7 सप्टेंबर रोजी होणाऱया फारआऊट इव्हेंटमध्ये आयफोन-14 सीरिज लाँच होणार आहे. त्याची काही वैशिष्टय़े लीक झाली आहेत. त्यानुसार आयफोन-14 मध्ये सॅटेलाईट कनेक्टिविटी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना मोबाईल कंपनीच्या नेटवर्कशिवाय कॉल आणि मेसेज करता येणार आहे. आणीबाणीवेळी याचा चांगला उपयोग होऊ शकणार आहे. आयफोन-14 मध्ये सॅटेलाईट कनेक्टिविटी मिळाल्यास मोठी क्रांती होऊ शकणार आहे.


























































