
कितीही हल्ले केले तरी हिंदुस्थानात लोकतंत्र सुरक्षित आहे, असे मत सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आज नोंदवले. विधी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
देशाची न्यायसंस्था कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तत्पर असून न्यायालयात कोणतेही प्रकरण आमच्यासमोर आले तर, आम्ही केवळ कायद्याच्या तत्त्वांनुसार आणि विचारांवर मार्गदर्शन करतो. न्यायालयीन खटल्यात कितीही धोकादायक परिस्थिती असली, तरी न्यायालयाच्या हद्दीत एखादा खटला आल्यावर त्याला समान वागणूक दिली गेली पाहिजे. जर कोणी दोषी असेल तर त्याच्यावर कायद्याची कठोर कारवाई झालीच पाहिजे. एखाद्यावर अन्याय झाला असेल किंवा कोणी पीडित असेल तर त्याला न्यायालयाच्या छताखाली संरक्षण मिळालेच पाहिजे. हे न्यायपालिकेचे काम आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत असे सरन्यायाधीश म्हणाले.



























































