
पाठारे प्रभु महिला समाजाचा 108 वा स्थापना दिन रविवारी खार येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी अनोखे रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. महिलांनी धान्याची, फुलांची, पाण्याखालची, पाण्यावरची अशा विविध संकल्पनेच्या रांगोळ्या साकारल्या.
रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिवादन करण्यात आले. पैठणीच्या रांगोळीने लक्ष वेधले. पाठारे प्रभु समाजातील मुली- महिलांच्या उत्कर्षासाठी 11 सप्टेंबर 1915 रोजी इंदुभवन हॉल, ठाकुरद्वार येथे संस्थेची स्थापना झाली होती. संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात.























































