जमिनीवर झोपा.. आजार पळवा..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बऱ्याचजणांची तक्रार असते की त्यांना रात्रीची झोप येत नाही.. त्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो.. तर जरा झोपण्याच्या पद्धतीत बदल करून पहा. आजकाल सर्वजण आरामदायी कॉयर बेडवर झोपतात. पण बहुतेकांना हा निद्रानाशाचा विकार सुरु होतो. जरा हा आरामदायी बेड बाजूला सारा.. आणि सतरंजी घालून चक्क जमिनीवर झोपा. जमिनीवर झोपल्याने केवळ तणावच नव्हे तर निद्रनाशासारख्या अनेक समस्यांवर मात करता येते.
जमिनीवर झोपण्याचे फायदे – पाठदुखीचा त्रास असलेल्या लोकांना उठण्याची अडचण असल्याने पलंगावर झोपण्याचा सल्ला दिला जातो. पण जर उठणे शक्य होत असेल तर आवर्जून जमिनीवर झोपा. पाठदुखीला आराम मिळेल. जमिनीच्या कडकपणामुळे पाठीचा कणा ताठ राहतो. त्यामुळे शरीराची ठेवण सुधारते.
झोप न लागणे – आरामशीर झोप ही गादीवरच लागते असा एक सर्वसाधारण समाज असतो. पण कितीतरी वेळेला चुकीच्या गादीमुळे झोपच लागत नाही. अशावेळेस जमिनीवर झोपणे फायद्याचे ठरते. उन्हाळ्यात जमिनीवर झोपल्यास शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. रक्त प्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे मनावरचा तणाव कमी होतो.
जमिनीवर झोपण्याच्या पद्धती – झोपण्यापूर्वी जमीन स्वच्छ ठेवा. जमिनीवर गवताची चटई किंवा लोकरीची कांबळी घालून झोपा.