Pune – सिमेंट मिक्सर रिक्षावर उलटला, रिक्षाचालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील हडपसर भागात झालेल्या एका दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या सिमेंट मिक्सरने स्कूटरला धडक दिली आणि नंतर तो एका रिक्षावर उलटला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी गुरुवारी सकाळी 5.30 ते 6 च्या सुमारास घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरवाल्याला वाचविण्याच्या प्रयत्नात सिमेंट मिक्सर चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले होते. यामुळे हा मिक्सर रिक्षावर उलटला. रिक्षावर मिक्सर पडल्याने रक्षाचा चक्काचूर झाला आणि रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर रस्त्यावर रवीदर्शन समोरील लक्झरी आणि एसटी बसच्या थांब्यावर हा अपघात झाला आहे.