
– नवनाथ शिंदे
राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी ) घोटाळ्याचे पाळेमुळे खोदल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी आता देशभरातील नागरिकांना फसविणाNया लोनअॅप सायबर टोळीचा पर्दापाश केला आहे. त्यामुळे सायबर पथक विविध कारवाईत सर्वोत्कृष्ठ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ऑनलाईन लोनअॅप्लीकेशनच्या माध्यमातून तत्काळ लोण देण्याच्या नावाखाली टोळीने देशभरात तब्बल सव्वा लाखांवर नागरिकांचा डेटा एकत्रित केला होता. त्याद्वारे हजारो कोट्यावधींची माया गोळा करण्याचा डाव रचला होता. मात्र, पुणे पोलिसांनी तत्काळ तपास करीत कारवाई केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पुण्यात लोनअॅप सायबर टोळीच्या मनस्तापाला कंटाळून विमाननगरमध्ये तरूणाने आत्महत्या केली होती. त्याशिवाय लोणअॅपचा १५ हजारांचा हप्ता भरण्याासाठी तरूणीने आजीचा खून केल्याची घटना वारजेत घडली होती. त्यामुळे संबंधित टोळीविरूद्ध कारवाई करण्यासाठी सायबर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. दरदिवशी सायबर पोलिस ठाण्यात लोनअॅप फसवणूक तक्रारींचा आलेख वाढत होता. काही दिवसांतच ४ हजार ७७८ तक्रारी प्राप्त झाल्यामुळे पोलिसांसह नागरिकांमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टोळ्यांविरूद्ध कारवाईचे आदेश दिले होते. पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या पथकाने टोळीचा डेटा गोळा करण्यास सुरूवात केली. मागील १५ दिवसांत शहरातील नागरिकांनी लोणअॅपबाबत केलेल्या तक्रारी, धमकीचे येणारे फोन, बदनामी केलेल्या व्हायरल मेसेसचा डेटा पुणे सायबर पोलिसांनी धुंडाळून काढला. त्यावेळी पुण्यासह सोलापूर आणि बंगलोरमधून टोळ्या कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले.
संपुर्ण डेटा एकत्रित झाल्यानंतर कारवाईचा मास्टरप्लॅन तयार केल्यानंतर पुणे सायबर पोलिसांचे पथक कारवाईसाठी कनार्टक राज्यात पोहोचले. त्याठिकाणी बंगळूरू पोलिसांनी मदत घेत पथकाने छापा टाकला. अचानक झालेल्या कारवाईमुळे सायबर चोरट्यांचे धाबे दणाणले. त्याठिकाणाहून कॉम्पुटर, हार्डडिस्क, मोबाइल, तांत्रिक डेटा जप्त केला. आरोपींना अटक केल्यानंतर पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तांत्रिक विश्लेषणाद्वारे केलेल्या तपासात पोलिसांचेही डोळे विस्फरतील एवढा डेटा आढळून आला. तब्बल 1 लाख 20 हजारांवर नागरिकांची इंत्यभूत माहिती सायबर चोरट्यांकडे असल्याचे उघडकीस झाले. त्याद्वारे सायबर टोळके हजारो कोट्यावधींची माया गोळा करण्याच्या तयारीत होते. मात्र, पुणे पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे लाखांवर नागरिकांच्या आर्थिंक गंड्याला आडकाठी निर्माण झाली.
पुण्यात 4 हजार 778 लोनअॅपद्वारे नागरिकांना गंडा
अतिशय कमी वेळेत रक्कम मिळविण्याच्या नादात नागरिकांकडून कोणत्याही गोष्टीची खातरजमा केली जात नाही. त्यामुळेच अवघ्या काही दिवसात सायबर चोरट्यांनी 4 हजार 778 नागरिकांना ऑनलाईनरित्या लाखोंना गंडा घातला होता. दिवसेंदिवस लोणअॅप फसवणूकीत वाढ झाल्यामुळे पुणे पोलिसांनी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करीत सायबर टोळीचा डाव उधळला आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक दगडू हाके, मीनल पाटील, कुमार घाडगे, अंकुश चिंतामण, एपीआय शिरीष भालेराव, बलभीम ननवरे, किरण मदने, कदीर देशमुख, उपनिरीक्षक अनिल डफळ, आनंदराव ढवळे, संदीप कदम, चित्रा चौधरी, शिरीष गावडे, नीलम साबळे यांच्यासह इतरांनी केली.
अर्धनग्न फोटोची भीती अन खंडणी
सायबर चोरट्यांकडून लिंक पाठवून नागरिकांना लोणअॅप डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जात होते. लोनअॅप अॅप्लीकेशनद्वारे युजरला 500 रूपयांपासून ते 7 हजारांपर्यंत कर्ज देण्यात येई. मात्र, हे अॅप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर युझरचा मोबाइल कॅमेरा, संपर्क यादी, ठिकाण, संदेश, डेटा, गॅलरीतील फोटो, व्हिडिओचा अॅक्सेस कंपनीला प्राप्त होत होता. त्यानंतर कंपनीकडून डेटा क्लोन करून जतन करून संबंधिताला पैसे वर्ग केले जात होते. त्यानंतर अवघ्या सात दिवसांत 30 ते 300 टक्क्यांपर्यत व्याज आकारणी भरण्यास सांगितले जात. त्यासाठी वेळोवेळी फोन करून मनस्ताप दिला दिला जात होता. त्याचे अर्धनग्न फोटो ओळखीतील लोकांना व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. बदनामी टाळण्यासाठी नागरिकांकडून सायबर चोरट्यांना पैसे पाठविले जात होते.
पुणे पोलिसांकडून विशेष मॉड्यूल तयार
लोनअॅपसंदर्भात पुणे पोलिसांकडून विशेष मॉड्युल तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे तक्रारदारांना स्वतःचे नाव शोधण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जर फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास मदत होणार आहे. त्याचा स्वतंत्र डेटा पोलिसांकडून तयार केला जाणार आहे.
लोणअॅपद्वारे नागरिकांची फसवणूक करून त्यांना मनस्ताप देणाNया टोळींचा बिमोड करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. विशेषतः सायबर टीमच्या मेहनतीमुळे देशात फसवणूकीचे मोठे षडयंत्र उघडकीस आले. संबंधित प्रकरण खूप दूरवर जाणार असून, त्याचा तपास तळागाळापर्यंत केला जाणार आहे. – अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे शहर
ऑनलाईन लोणअॅपला भुरळून अनेकांकडून तत्काळ लोण काढले जात होते. मात्र, काही दिवसांत त्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले. त्याबाबत तक्रारींचे प्रमाणही वाढले होते. त्यापाश्र्वभूमीवर सायबर टीममधील प्रत्येकाने जबाबदारीने काम केल्यामुळे देशातंर्गत फसवणूकीचे रॅकेट उघडकीस आले. – भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त, आर्थिंक व सायबर विभाग

































































