
पाकिस्तानच्या कब्जातील गिलगित–बाल्टिस्तानचे मंत्री अबैद उल्लाह बेग यांना शुक्रवारी दहशतवाद्यांनी किडनॅप केले होते. बेग हे इस्लामाबादहून गिलगितच्या दिशेने जात होते. याचदरम्यान पाकिस्तानातील तहरीक–ए–तालिबान या कट्टरपंथी संघटनेच्या दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. वाटाघाटीनंतर शनिवारी बेग यांना सोडून देण्यात आले. हबीब उर रहमान तसेच इतर सहा दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी सरकारला 10 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. याच अटीवर बेग यांची दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटका केली.

























































