
आरबीआयकडून ‘रेपो’ दरात सतत वाढ केली जात असल्याने गेल्या तीन महिन्यांत गृहकर्जांचे व्याजदर वाढले आहेत. परिणामी पुण्यासह देशात घर खरेदी परवडण्याचा निर्देशांक घटलाय. मात्र, या निर्देशांकाच्या गेल्या नऊ महिन्यांच्या मूल्यांकनानुसार पुण्याने देशातील दुसऱया क्रमांकाच्या स्वस्त निवासी बाजारपेठेचे स्थान अबाधित ठेवले आहे, तर अहमदाबाद देशात सर्वाधिक परवडणाऱया गृहनिर्माण बाजारपेठेचे शहर ठरले आहे. ‘नाइट फ्रँक’च्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे.



























































