अण्णा नाईक वेगळय़ा भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा सुरू झालेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. मालिकेत नुकतीच अनुष्काची एन्ट्री झाली. प्रार्थनाचा हा बदललेला लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे. आता या मालिकेत जयंतीलाल मेहेताची एन्ट्री होणार आहे. आता हे जयंतीलाल मेहेता कोण आणि अनुष्कासोबत त्याचा काय संबंध आहे, हे येणाऱया भागात कळणार आहे. जयंतीलाल मेहेताचा भूमिकेत ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत अण्णा नाईकांची भूमिका गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर आहेत. आता जयंतीलाल यांच्या येण्याने यशच्या आयुष्यात काय घडणार हेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.