
पोस्ट विभागात नोकरीची सर्वात मोठी संधी चालून आली आहे. पोस्टात तब्बल 98 हजार पदांची बंपर भरती होणार आहे. पोस्ट विभागाच्या वेबसाइटवर या भरतीची सूचना जारी करण्यात आली असून पोस्टमन, मेल गार्ड आणि अन्य पदांसाठी ही भरती होणार आहे. मुख्य म्हणजे दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी या भरतीमुळे नोकरीची कवाडे खुली झाली आहेत.
पोस्टातील भरतीसाठी अर्ज करायचा आहे, अशा इच्छुकांनी indiapost.gov.in या पोस्टाच्या वेबसाइटवर ‘पोस्ट ऑफिस व्हेकन्सी 2022’ या सेक्शनला जाऊन नोंदणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे. दहावी आणि बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार या पदासांठी पात्र असेल. भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख डिसेंबर महिन्यात असणार आहे. ही तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही पोस्ट विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पोस्टमनची सर्वाधिक पदे
एकूण 98 हजार 83 पदे भरली जाणार आहेत. यात पोस्टमनची 59 हजार 99 पदे, मेल गार्डची 1 हजार 445 पदे तर मल्टीटास्पिंग स्टाफ म्हणून 37 हजार 539 पदे भरण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा 18 ते 32 वर्षे
पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी टास्पिंग स्टाफ अशा पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी 18 ते 32 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. एसटी/एससी – 38 वर्षांपर्यंत तर ओबीसी – उमेदवाराचे वय 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे.
शैक्षणिक पात्रता
पोस्टमन पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. n मेल गार्ड पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक. संगणकाचे बेसिक ज्ञान हवे. n मल्टीटास्पिंग स्टाफसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण तसेच संगणकाचे बेसिक ज्ञान आवश्यक.
महाराष्ट्रात किती जागा?
पोस्टमन 9,884
मेल गार्ड 147
एमटीएस पदे 5,478
– 33 हजार 718 ते 35 हजार 370 रुपये प्रतिमहिना वेतन मिळणार आहे.
– 100 रुपये परीक्षा फी असणार आहे. सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रान्स वुमन अर्जदार यांना या फीमधून सूट.




























































