
मोबाईलवरून यूटीएस अॅपमधून ई-तिकीट काढताना दोन किमी अंतराची अट घालण्यात आली होती. त्यामुळे प्रवास करताना स्थानक जर घरापासून लांब असेल तर पेपरलेस तिकीट मोबाईलवरून बुक अडचण येत होती. त्यामुळे दोन कि.मी.ची ही अट दूर करून आता उपनगरीय लोकलसाठी 5 कि.मी. तर लांब पल्ल्यासाठी 20 कि.मी. अंतरावरून पेपरलेस तिकीट बुक करता येणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
यूटीएस मोबाईल अॅप प्रवाशांना सहज वापरता यावे याकरिता रेल्वेने पुढाकार घेतला आहे. आता प्रवाशांना उपनगरीय लोकलचे मोबाईल तिकीट आता 5 किलोमीटर अंतरावरून तर लांब पल्ल्याचे रेल्वे मार्गावरील तिकीट 20 किलोमीटरच्या अंतरावरूनही काढता येणार आहे. रेल्वे बोर्डने मोबाईल तिकीट काढण्याच्या अंतराच्या निर्बंधात शिथिलता देऊ केली आहे.
यूटीएस मोबाईल अॅप येऊनही रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील रांगा काही केल्या कमी होत नाहीत. त्यामुळे एकूण तिकिटांच्या विक्रीपैकी केवळ 7 ते 8 टक्के तिकीट विक्री यूटीएस मोबाईल अॅपवरून होते. मोबाईल तिकीटचा खप वाढवावा, प्रवाशांनी अधिकाधिक अॅपमधून तिकीट घ्यावे यासाठी यूटीएस अॅपमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.



























































