गुहागर-विजापूर रस्त्याचे काम दहा दिवसात सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन, क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुहागर-विजापूर महामार्ग रस्त्याची दुरवस्था आणि अर्धवट कामासंदर्भात आज शिवसेनेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन जाब विचारला. पुढील दहा दिवसात योग्य ती उपाययोजना न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा चिपळूण विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी दिला आहे.

गुहागर-विजापूर महामार्गावरील पिंपळी, मुंढे, शिरगाव, पोफळी, कुंभार्ली, कोंड फणसवणे दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून अर्धवट काम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिकांना त्याचा त्रास होत आहे. या अर्धवट कामाचा जाब आज शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांना विचारला. यावेळी चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, विभागप्रमुख नयनेश नारकर, उपविभागप्रमुख निलेश शिंदे, प्रसाद कोंडगे, प्रकाश सुर्वे, जितेंद्र शिंदे, उपशहरप्रमुख यतीन कानडे, युवराज पवार आणि इतर शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी कार्यकारी अभियंता रामसे यांनी रस्त्याच्या कामासंदर्भात पुढील दहा दिवसात योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पुढील दहा दिवसात उपाययोजना न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी दिला.