राजगिरा उपवासाला का खातात?? आरोग्यदायी.. पौष्टिक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी, देवदिवाळीनंतर आता वेध लागले आहेत मार्गशीर्षातील गुरुवारचे.. आपल्याकडे कोणत्याही साधनेचा प्रथम मार्ग म्हणंजे उपवास. सगळे उपवासी सणवार आटोपले असले तरी मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी बहुसंख्येने महिला वर्ग उपवास करतात. आहारात सतत साबुदाणा घेऊन एसिडीटी होते, त्रास होतो.. शिवाय वजन वाढण्याची भीती असते ती वेगळीच. त्यामुळे वरइचे तांदूळ, राजगिरा हे उपवासासाठी आरोग्यदायी आणि खऱ्या अर्थाने सात्विक पदार्थ आहेत. वैद्यकीयदृष्ट्या राजगिऱ्याचे पौष्टिक गुणधर्म पाहूया.

१) राजगिऱ्यात काल्शीयम भरपूर असल्याने व लायसीन हे calcium शोषणास मदत करणारे जीवनसत्व असल्याने हाडांची मजबूती राखते.

२) क जीवनसत्व भरपुर असल्याने त्वचा, केस यासाठी खूपच ऊपयुक्त शिवाय हिरड्याच्या विकारात ऊपयुक्त ठरते.

३) राजगिऱ्यात insulin वर नियंत्रण राखण्याचा विशेष गुणधर्म आढळतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये ऊपयुक्त ठरते.

४) राजगिरा Gluten free,fibers ने युक्त आहे. त्यामुळे वजन कमी करताना ऊपयुक्त ठरतो.

५) यात माग्नेशियम अधिक असल्याने मायग्रेनमध्येही ऊपयुक्त ठरते.

६) यामध्ये फायबर असल्यामुळे रक्तवाहिन्यातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.हृदयाचे स्वास्थ्य राखते.

आता आयुर्वेदीक दृष्टीकोन पाहूया.

 आयुर्वेदाने राजगिरा रूचीवर्धक सांगितले आहे.त्यामुळे पचनव्याधीनंतर जेवण नकोसे होणारी भावना कमी करण्यास मदत करते.

 “रक्तशोधक” सांगीतले आहे. त्यामुळे रक्तपित्त, त्वचा विकार, यात ऊपयुक्त ठरते.

 “स्तन्य” हा राजगिऱ्याचा गुणधर्म सांगितला आहे. म्हणजेच मातृत्वामध्ये स्तनदुग्धाची वृद्धी याच्या नियमित सेवनाने होते.

 “मलसारक” हा राजगिऱ्याचा गुण बद्धकोष्ठ, संग्रहणी या व्याधीत उपयुक्त ठरते.

 “हृद्य” हाही गुणधर्म सांगितला आहे. म्हणजेच हृदयासाठी उत्तम सांगितले आहे.

 नेत्ररोगांमध्ये राजगिऱ्याचे सेवन सांगितले आहे. रोजच्या आहारात राजगिरा असेल तर दृष्टी उत्तम राहते.

 स्थौल्य कमी करण्यासाठी आयुर्वेदाने रोज राजगिऱ्याचे सेवन सांगितले आहे.

 पंडूरोगामध्ये राजगिरा ऊपयुक्त सांगितला आहे.

 केस गळणे, केस पांढरे होणे हे विकार राजगिरा सेवनाने टळतात.

 “रक्तस्तंभक” म्हणजे रक्तस्त्राव थांबवण्यास मदत करते, त्यामुळे रक्तार्श (heamorhoids) मध्ये ऊपयुक्त ठरते.

हे सर्व गुणधर्म राजगिऱ्याची पाने व बियांमध्ये असतात. त्यामुळे राजगिऱ्याच्या पानांची भाजी, रस आहारात समाविष्ट करावी. तसेच राजगिरा हा लाडू, पराठे, थालिपीठ, शिरा, खीर अशा अनेक स्वरूपात बनवता येतो. चाकलेट्सची जागा राजगिऱ्याच्या लाडवांनी किंवा चिक्कीने घेतली तर उत्तमच! वजन कमी करताना राजगिऱ्याच्या लाह्या तुम्ही ओट्स, कार्नफ्लेक्सऐवजी घेऊ शकता. मधुमेहीसुद्धा त्यांची न्याहारी राजगिऱ्याचं थालिपीठ, लाह्या, भाकरी असे ठेऊ शकतात.