भंडारा आणि गोंदिया जिह्यातील युवासेनेच्या पदांकरिता मुलाखती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारा आणि गोंदिया जिह्यातील युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येणार असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. भंडारा जिह्यातील मुलाखती शनिवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे तर गोंदिया जिह्यातील मुलाखती 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, गोंदिया येथे होणार आहेत.

युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येईल, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.