माजिद मेमन तृणमूल काँग्रेसमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार अॅड. माजिद मेमन यांनी  आज नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन व सौगत रॉय यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. माजिद मेमन नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. पण त्यांनी ट्विट करून आपण वैयक्तिक कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याची माहिती दिली होती. मजिद मेमन हे प्रसिद्ध फौजदारी वकील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. 2014 ते 2020 या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते खासदार होते.