अव्यक्त प्रेमभावना भक्ती जोशी यांचे नवे गाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गझलकार भक्ती जोशी यांचे नवे गाणे येत आहे. ‘कळले नाही, प्रेमाचे हे, जुळले धागे, कधी कसे…’ असे या प्रेमगीताचे बोल आहेत.  प्रेम आहे, पण ते एकमेकांसमोर व्यक्त झालेले नाही. दोघे एकमेकांपासून दूर आहेत. दोघांच्या मनातील या अव्यक्त भावनांना भक्ती जोशी यांनी शब्दबद्ध केले आहे.

‘कळले नाही’ गीताला यश सोमण यांनी संगीत दिले आहे. सौरभ करमरकर आणि श्रीया शिंदे यांनी गाणे गायले आहे. 17 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता हे गाणे ‘भक्तीलेख’ या युटय़ूब चॅनेलवर रिलीज केले जाईल. विरारच्या भक्ती जोशी या गझलकार, कवयित्री आहेत. ‘कळले नाही’ हे त्यांचे दुसरे गीत आहे. ‘मनाच्या बांधावर’ हा लघुकथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. याशिवाय प्रतिलिपी अॅपवर त्यांच्या सहा कादंबऱया प्रकाशित झालेल्या आहेत.