पत्रकार रवींद्र खर्डीकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील पत्रकार रवींद्र खर्डीकर (39) यांचे आज अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सदस्य असलेले रवींद्र खर्डीकर गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज  उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर ठाण्याच्या जवाहर बाग स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.