
जेनवर्क्सने इन विट्रो डायग्नोस्टिक (आयव्हीडी) ऑफरिंग्ज दाखवण्यासाठी देशभरातील 25 शहरांमध्ये रोड शोचे आयोजन केले आहे. या रोड शोसह कंपनीची अधिकाधिक डॉक्टर्स, पॅथोलॉजिस्ट्स व लॅब टेक्निशियन्सपर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे. गर्भधारणा, रक्तातील ग्लुकोज आणि कोविड-19 (बहुतांश) यांसह सर्व महत्त्वाच्या रक्त चाचण्या अभिकर्मकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात. हा महत्त्वाचा पदार्थ आणि रक्त तपासणी यंत्रे आयव्हीडी परिसंस्थेचा अविभाज्य घटक आहेत. आतापर्यंत जेनवर्क्सने अनेक प्रयोगशाळा आणि हॉस्पिटल्समध्ये 2500 आयव्हीडी सिस्टम्सचा पाया स्थापित केला आहे. जेनवर्क्स येथील इक्विपमेंट, आयव्हीडीचे वरिष्ठ संचालक व प्रमुख सुब्रमण्यम आर. रोड शो उपक्रमाचे नेतृत्व करत आहेत. ‘आम्ही मागील काही वर्षांमध्ये आमच्या सेवांमध्ये आयव्हीडी व्हर्टिकलची भर केली आहे आणि आता अधिकाधिक लोकांपर्यंत ही सेवा पोहोचण्याची योग्य वेळ आली आहे.


























































