
पेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहेत. सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापनाचे वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा होईल. तर याच कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सीबीएसईच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास ऑनलाइन प्रणालीत अनुपस्थितीची नोंद करावी. संबंधित विद्यार्थ्याची परीक्षा याच कालावधीत अन्य दिवशी घेऊन रिशेडय़ुल्ड अशी नोंद करण्याबाबत सीबीएसईने स्पष्ट केले.
n सेंट्रल बोर्ड ऑफ सेपंडरी एज्युकेशन (सीबीएई) ने 10 वी आणि 12 वीची बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दहावीचा शेवटचा पेपर 21 मार्चला, तर 12 वीचा शेवटचा पेपर 5 एप्रिल रोजी होणार आहे.
























































