
दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिसरे तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी दोघांना तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
अमोल गुलाब आकळे (कय 36, रा. काठार, ता. कोरेगाक), आप्पासाहेब ऊर्फ किजय जगन्नाथ घोरपडे (46, रा. द्रोणागिरी सोनके, ता. कोरेगाव) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आकळे, घोरपडे हे दोघे 25 जुलै 2007 रोजी सातारा तहसील कार्यालयामध्ये गेले होते. त्याकेळी नायब तहसीलदार प्रशांत पिसाळ (रा. सातारा) यांनी एका प्रकरणामध्ये आरोपीला जामीनचा आदेश दिला. यावरून चिडून संशयितांनी पिसाळ यांना दमदाटी करून शासकीय कामात अडथळा आणला होता.
सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मायणे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने वरील दोघांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. नितीन मुके, ऍड. पुष्पा जाधव यांनी काम पाहिले.




























































