अभिनेता अक्षय कुमारने घेतले साईदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने शिर्डीत साई दरबारी दर्शनाला हजेरी लावलीय. साईभक्‍त असलेला अक्षय कुमार अनेकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो. अक्षयकुमारने बुधवारी साईबाबांची पाद्यपुजा करत मनोभावे दर्शन घेतले.

अभिनेता अक्षयकुमार शिर्डीत पोहचताच त्याला बघण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. साईदर्शन घेऊन बाहेर पडत असतात गर्दीत अक्षयकुमारचा चाहता खाली पडला. त्याला स्वतः अक्षयकुमारने हात देत उठवले आणी काळजी घेण्याचा सल्ला दिला. साईदर्शनासाठी आलेल्या अक्षयकुमारचे साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी अक्षयकुमारचे स्वागत केले.