
सामाजिक सुरक्षा विभागाने जुगार अड्डयावर छापा टाकून 8 जणांविरुद्ध कारवाई करीत 9 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई चंदननगरमधील पुणेश्वर मित्रमंडळ परिसरात करण्यात आली.
पुणेश्वर मित्रमंडळ परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला. 8 जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कामगिरी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, एपीआय अश्विनी पाटील, अजय राणे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांनी केली.



























































