शिवसेनेला दलित पँथरचा बिनशर्त पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्तीचे मनोमिलन करण्याच्या दृष्टीने दलित पँथरच्या पदाधिकाऱयांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांची इचलकरंजीत भेट घेऊन शिवसेनेला बिनशर्त पाठींब्याचे पत्र दिले आहे.

1977 साली दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दलित पँथरची युती झाली होती. त्याच धर्तीवर दलित पँथरचे केंद्रीय सचिव डी. एस. डोणे तसेच, प्रदेश सचिव प्रा. अशोक कांबळे यांनी इचलकरंजीतील घोरपडे नाटय़गृहात खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बिनशर्त पाठींबा असल्याचे पत्र दिले आहे. आम्ही फक्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षालाच मानतो. केवळ याच पक्षाला आमचा बिनर्शत पाठींबा आहे. इतर राजकीय पक्षांचा  आणि आमचा संबंध नाही, असे डोणे यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, प्रवक्ते लक्ष्मण हाके, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड उपस्थित होते.