
अति उष्णता आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे एकतर आधिच आंबा पिक धोक्यात आलेले आहे. त्यात कुठे तुरळक असलेले पिक हातात येण्याआधीच आंबा पिक फळांचे माकडांच्या टोळधाडी अतोनात नुकसान करत सुटल्या आहेत. त्यामुळे बागातदार चांगलेच आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना उभारी देण्यासाठी शासनाकडून विना परतावा ठोस आर्थिक मदतीचे अनुदान देण्याची खरी गरज आहे.
कोकणात शेती अथवा फळ बागा असतील त्यांचे क्षेत्र हे मर्यादितच असते. निसर्ग संपन्न कोकणात डोंगर उतारावर येथील रहीवाशांनी आपल्या तुटपंज्या जागेत शासनाच्या रोजगार हमी फळ लागवड योजनेतून पाच पंचवीस आंबा काजूची रोपे लावली होती. ती लावलेली फळ लागवड आता बाजती झाली आहे. अशाचप्रकारे कोकणातील दापोली तालूक्यात हापुस आंबा पिकाला चांगले पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतक-यांनी येथे आंबा पिकाच्या फळ लागवडी केलेल्या आहेत. मात्र यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे आंबा पिक आधीच धोक्यात आले आहे. यावर्षी जेमतेम बारा ते पंधरा टक्केच आंबा पिक आहे. काही प्रमाणात असलेले आंबा पिक अजून हाती आलेले नाही. झाडावर असलेल्या आंब्याच्या फळांना माकडे अर्धवट खावून फळे खाली पाडून टाकत आहेत. माकडांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे हा माकडांचा उपद्रव शेतक-यांची आर्थिक हानी करणारा आहे. यामुळे शेतकरी बागायतदार माकडांच्या या उपद्रवाने हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या शेतीपिकाच्या लागवडीची नासधुस करणाऱ्या उपद्रवी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाकडे कोणतीही सक्षम अशाप्रकारची उपाय योजना शासनस्तरावर कार्यान्वित नसल्याने शेतकऱ्यांच्या शेती आणि फळ पिकांचे वन्य प्राण्यांकडून अतोनात नुकसान होत आहे. वानर, केळटी हे वन्य प्राणी आंबा, काजू फळांचे तर नुकसान करतातच शिवाय लागवड केलेल्या फळझाडांच्या रोपांची नासधूस करतात त्यामुळे फळझाडांच्या रोपांचे नुकसान होत आहे. याबाबत नुकसानीची वन विभाग अथवा कृषी विभागाकडे कोणतीही मोजदातीची यंत्रणा नसल्याने झालेले नुकसान कागदावर येत नाही. कागदावर नुकसानीचा आकडा येत नसल्याने शेतक-यांना नुकसान भरपाई मिळत नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अर्थचक्राच्या संकटातून पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस अशाप्रकारचे विनापरतावा अनुदान देवून दिलासा देण्याचे काम शासनाने करावे अशाप्रकारची मागणी दापोली तालूक्यातील शेतकरी आंबा बागायतदारांकडून होत आहे.



























































