वादळी वाऱयाने नगर जिल्ह्यात दाणादाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यातील राहुरी, संगमनेर, नेवासा, राहाता, जामखेड, कर्जत आदी तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. संगमनेर शहरासह परिसरात शुक्रवारी (दि. 28) दुपारी अवकाळी पावसासह तुरळक गारा पडल्या. वादळी वाऱयाने आरगडे मळा येथील दोन खोल्यांचे पत्रे उडाले. अनेक ठिकाणी छोटे वृक्ष उन्मळून पडले. पठार भागातही पाऊस झाला आहे.

राहुरी तालुक्यातील केंदळ, चणकापूर, मांजरी, ब्राह्मणी, उंबरे या गावांना पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱयाने अनेक शेतकऱयांच्या घरावरील पत्रे उडून गेले; तसेच शेतातील उभ्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. वादळाच्या तडाख्यात मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. विद्युत वाहिनीच्या पोल तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसाने सोनईसह परिसराला झोडपून काढले. वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पाऊण तास चाललेल्या पावसाने सगळीकडे दाणादाण उडवली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. वादळी वाऱयाने अनेक झाडे उन्मळून पडली. सोनई-शनिशिंगणापूर, गणेशवाडी, करजगाव, पानेगाव, चांदा, खरवंडी, वडाळा आदी ठिकाणी घरांचे पत्रे उडाले.