
जामखेड बाजार समितीची निवडणूक आज पार पडल्या नंतर भाजप आमदार राम शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री राधाकृष्ण विथे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात, हे आज मला पाहायला मिळालं अनुभवायला मिळालं, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणूकीत भाजपअतंर्गत सुरू झालेला वाद आता चव्हाट्यावर आला आहे.
बाजार समिती सभापती निवडीवरुन आमदार प्रा. राम शिंदे यांनी मंत्री विखे पाटील आणि खा.विखे यांच्या वर गंभीर आरोप केलेत. विखे पक्षाच्या विरोधात काम करतात हा अनुभव आला आहे, असे सांगून शिंदे यांनी भाजपमध्ये असे प्रकार चालणार नाही असं म्हटलंय. शिंदे यांच्या आरोपानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटील म्हणाले की, आमदार राम शिंदे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी काही गैरसमजुती मुळे आरोप केले आहेत. वास्तविक त्यांनी आरोप करण्यापूर्वी आपल्याशी चर्चा करायला हवी होती असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.




























































