
>> मृणाल घनकुटे
आपली धावपळीची जीवनशैली लक्षात घेता नेहमीप्रमाणे आपलं आपल्या आरोग्याकडे व त्वचेकडे दुर्लक्ष होतं. आपली त्वचा ही एक नैसर्गिक ढाल आहे, जी आपले सर्व पर्यावरणीय प्रदूषकांच्या थेट संपर्कापासून संरक्षण करते. त्यामुळे आपल्या त्वचेची योग्य काळजी घेणे आणि निरोगी स्किनकेअर दिनचर्येचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. हल्ली स्किनकेअर दिनचर्येत चेहऱ्याच्या मसाजची (फेस मसाज) निवड केली जात आहे.
स्किनकेअर रुटिनमध्ये चेहऱ्याचा मसाज समाविष्ट करण्याचे काय फायदे आहेत याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी डॉ. त्वचा स्किन क्लिनिक येथील डॉ. हेमांगी आंग्रे यांनी मार्गदर्शन केले.
लिम्फॅटिक ड्रेनेज वाढवतेः लिम्फॅटिक ड्रेनेज ही एक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे शरीरातून कचरा आणि हानीकारक साफ केले जातात. लिम्फॅटिक फंक्शन वयोमानानुसार बिघडते आणि लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारण्यासाठी सर्वोत्तम पद्धत म्हणजे फेस मसाज करणे. याव्यतिरिक्त, नियमित चेहऱ्याच्या मसाजमुळे तुमच्या त्वचेचे सामान्य आरोग्य सुधारेल, जे चेहऱ्यातील लिम्फॅटिक ड्रेनेजला उत्तेजित करण्यास मदत करेल. थोडक्यात म्हणजे मसाज केल्याने पेशींमधून विषारी पदार्थ बाहेर निघून जातात, त्वचा डिटॉक्सिफाय होते आणि त्वचेच्या पुनरुत्पादनास प्रोत्साहन मिळते.
चेहऱ्याची उत्कृष्ट काळजी घेणे हीच निरोगी त्वचा मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. चेहऱ्याला मसाज केल्याने केवळ त्वचेचे आरोग्य आणि दिसणंच नव्हे, तर मानसिक तणावही कमी होईल. आपल्या त्वचेसाठी किंवा त्वचेच्या समस्यांसाठी योग्य उत्पादने निवडणे आवश्यक आहे. यासंदर्भात स्किनकेअर तज्ञाचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
स्नायूंचा टोन सुधारतो
बहुतेक लोकांच्या चेहऱ्यावर तणाव असतो हे नाकारता येत नाही. जेव्हा आपण जास्त लक्ष केंद्रित करतो किंवा अत्यंत चिडचिड करतो तेव्हा आपण आपल्या कपाळावर आणि डोळ्याच्या क्षेत्रामध्ये तणाव निर्माण करतो, ज्यामुळे कालांतराने सुरकुत्या येऊ शकतात. नियमित चेहऱ्याचा मसाज आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंचा टोन आणि ताकद सुधारण्यास मदत करेल.
तणावापासून मुक्ती
व्यस्त जीवनशैलीत आपण सतत चिंता आणि तणावापासून अलिप्त राहू शकत नाही. परिणामी आपल्या त्वचेची हानी होते. तुमच्या स्किनकेअर पद्धतीमध्ये चेहऱ्याचा मसाज आणि सेल्फ केअरचे इतर प्रकार समाविष्ट केल्याने चेहऱ्याला आतून तजेलदार करणारे फायदे मिळू शकतात. त्यामुळे त्वचा रिलॅक्स होते. एक प्रकारे ही स्ट्रेस रिलीफ पद्धत आहे.
रक्ताभिसरण वाढवते
दररोजच्या धावपळीमुळे आपल्या चेहऱ्यावर टॉक्सिन्स जमा होतात. परिणामी सूज, बारीक रेषा आणि ब्रेकआऊट्स होऊ शकतात. चेहऱ्याचा मसाज रक्ताभिसरण वाढवतो, ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि पोषण अधिक कार्यक्षमतेने पोहोचण्यास मदत होते. तसेच त्यामुळे त्वचेचा टोन समान होतो आणि कचरा आणि प्रदूषक बाहेर पडतात, परिणामी, तुमचा चेहरा आत आणि बाहेर ताजा आणि स्वच्छ राहतो.


























































