निवडणूक आयोगच बोटाची शाई पुसणार! लेझर मार्क आणणार; ‘ईव्हीएम’मध्ये कॅमेराही बसवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग नवीन शक्कल वापरणार आहे. मतदान केल्यानंतर बोटावर शाईने खूण करण्याऐवजी लेझरने खूण केली जाणार आहे. शाईची खूण पुसण्याचे फंडे अनेकांना माहीत झाले आहेत, मात्र लेझरने केलेली खूण लगेच पुसणे शक्य नाही. अनेक दिवस ही खूण बोटावर राहील, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे.

मतदाराच्या बोटावर लेझरने खूण करण्याचा बदल याच वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून अमलात आणला जाऊ शकतो. सध्या याबाबत चाचणी घेतली जात आहे. लेझर तंत्रज्ञानामुळे मतदान प्रक्रियेतील हेराफेरी रोखता येईल, असा निवडणूक आयोगाला विश्वास आहे.

ईव्हीएम कॅमेरा

ईक्हीएममध्ये एक कॅमेराही बसकला जाणार आहे. हा कॅमेरा मतदान करत असताना मतदाराचा फोटो टिपणार आहे. त्या माध्यमातूनही बोगस मतदान रोखले जाणार आहे. सदर व्यक्ती दुसऱयांदा मतदान करण्याचा प्रयत्न करत असेल तर एआय तंत्रज्ञानाने त्याला ओळखून तसा अलर्ट निकडणूक अधिकाऱयाला जाणार आहे.

  • नवीन वर्षात दहा राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या राज्यांत लोकसभेच्या 122 जागा आहेत. एकूण जागांच्या 22 टक्के इतके हे प्रमाण आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात आठ अशा याचिका आहेत ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाग 2024च्या लोकसभा निवडणुकीवर होणार आहे.
  • मध्य प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून काँग्रेस जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलण्याच्या विचारात आहे. कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाच मुद्दा उचलून भाजपची ओबीसी व्होटबँक भेदली.
  • बोटाच्या नखावर लेझर स्पॉट उमटवला जाणार आहे. त्यामुळे ही व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आली तर पकडली जाईल. बोगस मतदान रोखण्यास हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असे सांगण्यात येत आहे.