शेगडीची फ्लेम कमी झालीय? ३ सोपे उपाय..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामाच्या ऐन गडबडीत शेगडीच्या एखाद्या बर्नरची फ्लेम कमी झाली की खूप गोंधळ उडतो. स्वयंपाक करण्याचा वेग तर कमी होतोच, यासह दुसरी कामंदेखील या एका गोष्टीमुळे खोळंबली जातात. आपण शेगडीच्या बर्नरची फ्लेम घरच्या घरी रिपेयर करू शकता. या काही टिप्समुळे कमी झालेली फ्लेम पुन्हा नव्यासारखी काम करेल.

सर्वात आधी हे काम करा
शेगडीच्या बर्नरची फ्लेम कमी होत असेल तर, सर्वात आधी सिलेंडर रेग्युलेटर बंद करा आणि कनेक्शन डिस्कनेक्ट करा. सोबत पाईप बाहेर काढून बाजूला ठेवा.

बर्नरची सफाई करा
बर्नरच्या छिद्रांमध्ये काही अडकले तर नाही ना, याची तपासणी करून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात बेकिंग सोडा मिसळून मिश्रण तयार करा. त्यात बर्नर काही वेळेसाठी ठेवा. नंतर टूथपिकच्या मदतीने प्रत्येक छिद्र स्वच्छ करा, शेवटी स्वच्छ पाण्याने धुवा आणि कोरडे करा.

गॅस पाईप तपासा
जर आपला गॅस पाईप ३ महिन्यांपेक्षा जुना असेल तर, गॅस पाईप आधी पहा. गॅस पाईप काही कालावधीनंतर खराब होतात. ज्यामुळे गॅस बर्नरपर्यंत योग्य प्रकारे पोहचत नाही. ज्यामुळे बर्नरमधील फ्लेम कमी जळते.

स्टोव्ह उघडून स्वच्छ करा
बर्नर आणि गॅस पाईप तपासल्यानंतरही फ्लेम कमी येत असल्यास, ही समस्या त्याच्या इतर भागांमध्ये देखील असू शकते. अशा वेळी स्क्रू ड्रायव्हरसारख्या गोष्टींचा वापर करून शेगडी उघडून स्वच्छ करा. तरी देखील फ्लेम लो असेल तर, शेगडी रिपेयर करणाऱ्याला बोलावून शेगडी ठीक करा