फणसाचा वापर कसा करावा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

कच्च्या फणसाची भाजी केली जाते. आपल्या रव्याच्या केकप्रमाणे फणसाचा सांदण हा प्रकार देखील कोकणात लोकप्रिय आहे. हा प्रकार केकसारखा मऊ आणि लुसलुशीत असतो. तुम्ही फणसाचे लोणचेदेखील बनवू शकता. गाजर, आंबा, मुळ्याचे लोणचे बनवता त्याचप्रमाणे फणसाचे लोणचेदेखील बनवता येते. याशिवाय फणसाचे वेफर्स अर्थात गरे लोकप्रिय आहेतच.. कोकणात आणि दक्षिण हिंदुस्थानात अधिक प्रमाणात हे गरे बनविण्यात येतात. स्नॅक्ससाठी हे उत्तम ठरतात.

उपयोग –
१) फणसाचे गरे सुकवून नंतर त्याचे दळून पीठ करून त्याची पातळ पोळी किंवा पुरी बनविल्यास वर्षभर फणसाचा आस्वाद घेता येतो.

२)लहान मुलांना ही फणसाची पोळी खाण्यास द्यावी, यामुळे त्यांच्या शरीराची वाढ चांगली होते.

३) फणसांच्या गऱ्याची खीर व कढीही उत्कृष्ट होते. तसेच फणसापासून जाम, जेली, मुरंबा तयार करता येतो. हे सर्व पदार्थ लहान मुलांना आवडतात म्हणून या सर्व पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा. कच्च्या फणसाची भाजी बनवावी तसेच आठळ्या ओल्या असताना त्यांची भाजी बनवावी किंवा वाफवून आंब्याच्या कोयीप्रमाणे खावीत.

४)फणसाची बी सुकवून दळून त्याचे पीठ बनवावे व या पिठाचा वापर भाजीत, आमटीत रश्श्यासाठी करावा किंवा त्याची थालिपीठे बनवावीत. हे अत्यंत पौष्टिक असल्याने अशक्तपणा, जुना ताप, कृशव्यक्ती यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आठळीच्या पिठाचा वापर करावा. आठळीच्या पिठापासून खीरही बनविता येते. रुग्णांसाठी खीर बनवून तिचा वापर करावा.

५) फसणाचे गरे, लहान मुलांच्या शक्तीप्रमाणे खाण्यास द्यावे. त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो.
६) फणसाची मुळे अतिसारावर उपयोगी पडतात.

७)फणसाची आठळी भाजून खावी. ही फार चविष्ट व पौष्टिक असते. म्हणून शरीर दणकट व बलवान होण्यासाठी तिचा वापर करावा.

८) सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावीत, यामुळे सांध्यावरची सूज कमी होऊन आराम मिळतो.

९) फणसाचा चीक शरीरावर जर बेंड आले असेल तर उपयोगी पडतो. या चिकामुळे बेंडाची सूज नाहीशी होऊन ते पिकते व त्यात असणाऱ्या ‘पू’चा निचरा होतो.

१०)कृशव्यक्तींनी वजन वाढविण्यासाठी रोज ७-८ फणसाचे गरे खावेत किंवा त्याच्या आठळ्याची खीर करून खावी.

11)सावधानता –
फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्यावर नागवेलीचे पान खाल्यास पोट फुगते व खूप त्रास होतो. अशा वेळी लिंबूपाणी प्यावे. त्यामुळे पोटफुगी कमी होते. पोट जास्त भरलेले नसताना मधासोबत गरे खाल्ल्यास बाधत नाहीत