मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडय़ाच्या आठही जिह्यांना रविवारी वादळी वाऱयाचा जबर तडाखा बसला. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव तसेच बीड, नांदेड, हिंगोली, जालना जिह्यात सोसाटय़ाच्या वाऱयाने दाणादाण उडवली. वादळी वाऱयाने अनेक ठिकाणी होर्डिंग्ज कोसळले, घरांवरील पत्रे उडाले. मराठवाडय़ात गेल्या आठवडय़ापासून प्रखर उष्णता जाणवत असून पारा चाळिशीपार गेल्याने काहिली वाढली आहे. आज दुपारच्या वेळी अचानक परभणी, बीड, धाराशीव तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड तसेच हिंगोली जिह्यात सोसाटय़ाच्या वाऱयाने धुमशान केले. वाऱयामुळे रस्त्यांवर धुळीचे लोट उठल्याने वाहनधारकांची पंचाईत झाली. वादळी वाऱयाने रस्त्यांवर लावण्यात आलेले होर्डिंग्ज पडले. अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडाले. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव जिह्यांतही वादळी पावसाने दाणादाण उडवली.