Odisha Train Accident बागेश्वर बाबांना रेल्वे अपघाताची आधीच माहिती होती? स्वत: खुलासा करत म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात 275हून अधिक प्रवाशांनी जीव गमावला, तर 1100हून अधिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी एक विधान केले असून त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अशा घटनांबाबत आधीच संकेत मिळतात, पण घटना घडणार आहे याची माहिती असणे आणि ती टाळणे हे दोन्ही वेगवेगळे असल्याचे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

बालासोरसारख्या अपघातांची आधीच माहिती मिळते का? असा प्रश्न धीरेंद्र शास्त्री यांना करण्यात आला होता. याला उत्तर देताना ते म्हणाले की, अशा घटनांचे काही संकेत मिळतात. परंतु घटना माहिती असणे ते टाळणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. भगवान श्रीकृष्णाला महाभारत घडणार असल्याची माहिती होती. परंतु ते महाभारत टाळू शकले नाहीत. यावेळी त्यांनी रेल्वे अपघाताची अशी घटना पुन्हा धडू नये आणि अपघातातील जखमी लवकराच लवकर बरे होवो अशी प्रार्थना केली.

काँग्रेसचा निशाणा

दरम्यान, बागेश्वर बाबांच्या विधानावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. मोठ्या घटनांचे संकेत मिळाले तर त्यांनी रेल्वे अपघाताबाबत का सांगितले नाही? बागेश्वर बाबा राजकारण करतात आणि त्यांचा अजेंडा हिंदू राष्ट्र आहे. बाबा बागेश्वर यांचा धर्माशी काहीही संबंध नसून ते राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते उदित राज यांनी केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

275 ठार

ओडिशातील बाहानगर बाजार स्टेशन येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन एक्सप्रेस आणि एका मालगाडीचा भयंकर अपघात झाला. अपघातात किमान 275 प्रवासी मृत्युमुखी पडले आणि 1100 वर जखमी झाले. शतकातील सर्वांत भीषण रेल्वे अपघात असे याचे वर्णन करण्यात येते. या रेल्वे अपघातात मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले आहेत. त्यामुळे 200 मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरूच आहे.