
>> नरेश यावलकर
ऑप्शन्स म्हणजे काय…. ऑप्शन्स म्हणजे खरेदी किंवा विक्री करण्याचे अधिकार. ऑप्शन्स म्हणजे विकल्प किंवा पर्याय. भांडवली बाजारातला हा सर्वात जुना प्रकार आहे.
ऑप्शन्स हा प्रकार म्हणजे फ्युचर्स किंवा कॅश मार्केटपेक्षा एकदम वेगळाच आहे. या प्रकारामध्ये वस्तूची खरेदी किंवा विक्री न करता त्या वस्तूची खरेदी किंवा विक्री करण्याचे अधिकार खरेदी किंवा विक्री करणे. भांडवली बाजारातील हा सर्वात जुना प्रकार आहे. कमोडिटी मार्केटमध्ये प्राचीन काळी ऑप्शन्समध्ये मोठा व्यवहार होत असे. सध्या शेअर बाजारात कसा व्यवहार होतो त्यावर लक्ष केंद्रित करू.
ऑप्शन्स विकत घेणारा- तो अधिकार विकत घेत असल्याने तो अधिकार विकणाऱयास अधिभार/प्रीमियम किंवा सोप्या भाषेत टोकन जी अत्यल्प कमी रक्कम असते (बाजार भावानुसार) ती देईन.
ऑप्शन्स विकणारा – तो अधिकार विकतो व तो जबाबदारी घेतो त्यामुळे ऑपशन्स विकत घेणाऱयाकडून प्रीमियम घेतो.
कॉल ऑप्शन्स – शेयर्स विकत घेण्याच्या अधिकारास कॉल म्हणतात. जर मला वाटत असेल की भाव वाढणार आहेत तर मी कॉल खरेदी करीन. कॉल ऑपशन्स खरेदी करणारा फक्त अधिकार खरेदी करतो व त्यासाठी प्रीमियम देतो व जबाबदारी घेत नाही तसेच ऑपशन्स विकणारा जबाबदारी घेतो. म्हणजे बाजार वर जाईल म्हणून कॉल खरेदी केला, पण बाजार खाली गेल्यास मी जबाबदारी घेतली नसल्याने माझे मी अगोदरच दिलेल्या प्रीमियमपेक्षा माझा जास्त तोटा होणार नाही.
पुट ऑप्शन्स – शेअर्स विकण्याच्या अधिकारास पुट म्हणतात. जर मला वाटत असेल की भाव उतरणार आहेत तर मी पुट खरेदी करीन. पुट ऑपशन्स खरेदी करणारा फक्त अधिकार खरेदी करतो व त्यासाठी प्रीमियम देतो व जबाबदारी घेत नाही तसेच ऑपशन्स विकणारा जबाबदारी घेतो. म्हणजे बाजार खाली जाईल म्हणून पुट खरेदी केला, पण बाजार वर गेल्यास मी जबाबदारी घेतली नसल्याने माझे मी अगोदरच दिलेल्या प्रीमियमपेक्षा जास्त माझा तोटा होणार नाही.
घर विकत घेणारा जसे बिल्डरला घराची किंमत जरी 2 कोटी असेल तरी सुरुवातीला टोकन म्हणून वीस लाख देतो. एकदा करार केल्यास बिल्डर भाव वाढवणार नाही, पण ते घर पूर्ण झाल्यावर घराची किंमत रु. 3 कोटी जरी झाली तरी जबाबदारी घेतल्याने त्याला 2 कोटीलाच द्यावे लागेल. काही कारणांनी घर बांधू न शकल्यास घर खरेदीदाराचे केवळ टोकन म्हणजे वीस लाख रुपयांचे नुकसान होईल.
मला असे वाटते की स्टेट बँक ऑफ इंडिया आजच्या भावापेक्षा भविष्यामध्ये जास्त भावामध्ये विकला जाईल. अशावेळी मी माझ्या आर्थिक क्षमतेनुसार 1) शेअर्स विकत घेईन किंवा 2) स्टेट बँक ऑफ इंडियाचा फ्युचर्स घेईन 3) मी अत्यल्प रक्कम भरून ऑप्शन्स खरेदी करीन.
ऑप्शन म्हणजे काय हे समजून घेतल्यावर कॉल किंवा पुट विकणारा काय विचार करतो हे पुढील लेखामध्ये समजून घेऊ.
शेअर मार्केट मार्गदर्शक
primetechnicals.com


























































