
श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या जनसेवा, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कोल्हे गटाचा गणेश परिवर्तन मंडळ व शेतकरी संघटना असा तिरंगी सामना गणेश निवडणुकीत रंगणार आहे. ऐनवेळी थोरात कोल्हे गटाबरोबर शेतकरी संघटनेची जागा वाटपाच्या घोळामुळे शेतकरी संघटनेच्या 8 उमेदवारांचा पॅनेल रिंगणात आहे. तर कोल्हे गटाच्या एका उमेदवाराची वेळेत माघार न झाल्याने तो उमेदवारही अपक्ष म्हणून रिंगणात आहे. 19 जागांसाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत. या कारखान्याची निवडणूक 19 जागांसाठी 17 जून रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी पाच गटांतून 8150 सभासद मतदार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 92 उमेदवारांपैकी 45 उमेदवारी अर्ज मागे घेतले.































































