
कोणालाही कडक उन्हात बाहेर पडायचे नसते, पण घराबाहेर तर पडावे लागते. अशा परिस्थितीत, तुम्हाला केवळ उष्णतेचाच सामना करावा लागत नाही, तर त्वचा टॅन होण्याची समस्यादेखील सहन करावी लागते. त्यामुळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क आणि सनस्क्रीन वापरतात. पण असे असूनही त्वचा टॅन होते. त्यामुळे आज स्किन टॅनिंग दूर करण्याचा सोपा उपाय सांगत आहोत.
हा घरगुती उपाय तयार करण्यासाठी दोन चमचे हळद पावडर घ्या. तव्यावर हळद टाकून नीट भाजून घ्या. हळदीचा रंग तपकिरी होईपर्यंत भाजा. आता एका भांड्यात हळद काढून थंड होऊ द्या. नंतर त्यात थोडे कच्चे दूध आणि सुमारे एक चमचा मध घाला आणि सर्व मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट शरीराच्या ज्या भागांवर टॅनिंग दिसत असेल त्या भागांवर तुमच्या गरजेनुसार लावा. नंतर ही पेस्ट काही वेळ तशीच राहू द्या, थोड्या वेळाने साध्या पाण्याने धुवा. याच्या मदतीने तुमच्या त्वचेचे टॅनिंग काही मिनिटांत सहज निघून जाईल.
हे उपायही ठरतील फायदेशीर
त्वचेवरील टॅन काढण्यासाठी तुम्ही दह्याचीही मदत घेऊ शकता. यासाठी दोन चमचे दही घ्या आणि त्यात एक चमचा तांदळाचे पीठ मिसळून पेस्ट तयार करा. नंतर ते टॅनिंग झालेल्या भागावर लावा आणि काही वेळ स्क्रब करा. त्यानंतर दहा मिनिटांनी त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा.
टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. यासाठी एका लिंबाचा रस काढून त्यात एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट त्वचेवर लावा आणि पंधरा मिनिटे तशीच राहू द्या. नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.


























































