मुंबईच्या ट्रायडन्ट हॉटेलला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या नरिमन पॉईंट भागात असलेल्या प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हॉटेल व्यवस्थापनाने अग्निशमन दलाला पाचारण केलं नाही. तरीही ही माहिती मिळताच अग्निशमन दलाने आपल्या गाड्या पाठवल्या. दरम्यान, अंतर्गत अग्निशमन यंत्रणेच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.